हौतात्म्याची बूज राखा!
आमच्या देशाचे तारू नक्की कुठे भरकटत चालले आहे? भ्रष्टाचार व घोटाळ्यांच्या लाटांचे तडाखे तर बसतच आहेत. दिल्लीचे राजकारण कमालीचे अस्थिर बनले आहे व या अस्थिरतेचा फायदा इस्लामी अतिरेक्यांबरोबरच गाडलेली खलिस्तानी चळवळीची भुतं घेऊ लागली आहेत. शिखांचा इतिहास हा राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रनिष्ठेचा आहे. मोगलांच्या आक्रमणाविरुद्ध शिखांनी तलवार उपसली व त्या तलवारीने राष्ट्रावरची आक्रमणे परतवून लावली. शिखांचे हौतात्म्य देशाच्या कारणी लागले. आज पंजाबात नेमके उलटे घडताना दिसत आहे. भिंद्रनवालेविरोधात सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाईचे नेतृत्व ज्यांनी केले त्या ले. जनरल के. एस. ब्रार यांच्यावर लंडनमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. ब्रार यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी जिंदा व सुखा यांना फाशी दिलेला दिवस हा ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने घेतला आणि त्याची अंमलबजावणीही झाली. हे कृत्य देशद्रोही आहे. हे कृत्य नुसते देशद्रोहीच नाही, जगाच्या पाठीवरील समस्त शीख बांधवांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहे. सुवर्ण मंदिरावर झालेल्या कारवाईत अरुणकुमार वैद्य यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जनरल वैद्य लष्करातील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला आले व १० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्यात दिवसाढवळ्या त्यांची हत्या खलिस्तानवाद्यांनी केली. त्यांचे मारेकरी जिंदा व सुखा यांना ९ ऑक्टोबर १९९२ ला फाशी दिले गेले. आता या जिंदा-सुखाला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने ‘हुतात्मा’ ठरवून त्यांच्या सन्मानार्थ धार्मिक प्रार्थनेचे आयोजन केले. मारेकर्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. त्यांचा जयजयकार केला. संपूर्ण देशाची मान शरमेने खाली झुकावी असाच हा प्रकार आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंगसारख्या अनेक शीख क्रांतिकारकांंनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्याचा हा अपमान आहे. कश्मीर खोर्यातील अतिरेक्यांना हुतात्मा ठरविण्याचा प्रकार पाकिस्तानातील दहशतवादी गट करीत आहेत. पंजाबातही तेच घडत असेल तर या खलिस्तानी चळवळीचा गाडलेला मुडदा कोण उकरून काढत आहे ते स्पष्ट होते. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच शीख मारेकर्यांनी केली. त्या मारेकर्यांनाही हुतात्मा ठरवून त्यांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. हे सर्व घडत असताना केंद्र सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत पुचाट भूमिका घेऊन केंद्र सरकारच्या नामर्दानगीवर शिक्कामोर्तब केले. ज्यांनी हुतात्म्यांचा अपमान केला व देशाच्या मारेकर्यांचा सन्मान केला त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारल्यावर आमचे गृहमंत्री म्हणतात, ‘कुणी हरकत घेत नाही तोपर्यंत कशी कारवाई करणार?’ गृहमंत्री, तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? देशद्रोह्यांवर हरकत घेतली तरच कारवाई, हा कोणता कायदा? देशाचा गौरव व शिखांच्या स्वाभिमानास धक्का लावणारे कोणीही असोत, त्यांना दयामाया दाखवू नका. हरकतीची कसली वाट पाहता? रॉबर्ट वढेरांच्या कारवायांवर सध्या हरकतीच हरकती सुरू आहेत. म्हणून कारवाई केलीत काय? पुचाटपणा बंद करा व खंबीर पावले उचला. नाहीतर देशातील शिखांच्या हौतात्म्यास कायमचा कलंक लागेल.
मलाला नावाची ‘ठिणगी’
मलाला युसूफझाई या पाकिस्तानी शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला करणार्याची माहिती देणार्यास एक कोटीचे बक्षीस देण्याची आणि हल्लेखोराला कठोर शिक्षा करण्याची घोषणा आता पाक सरकारने राणा भीमदेवी थाटात केली आहे. प्रत्यक्षात तसे खरोखर घडेल का, हा एक प्रश्नच आहे. कारण मुळात पाकिस्तानी राज्यकर्तेच तालिबान आणि इस्लामी दहशतवादी गटांचे पोशिंदे आहेत. त्यांच्यातील संबंध अनेकदा उघडही झाले आहेत. शिवाय दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाईचे धाडस आजपर्यंत कुठल्याच पाक सत्ताधार्याने केलेले नाही. त्यामुळे आज मलालासारख्या वीरबालेच्या बाजूने बोलणारे पाक सरकार उद्या हा धुरळा खाली बसल्यावर मलालाच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी एवढ्याच ठामपणे उभे राहील याची कोण खात्री देणार? मलाला युसूफझाई या १४ वर्षीय शाळकरी मुलीचे धाडस स्वातसारख्या तालिबान्यांचा पूर्ण कब्जा असलेल्या प्रांताचा विचार केला तर निश्चितच असामान्य ठरते. तालिबानी राजवटीतील शालेय विद्यार्थ्यांची तडफड, घुसमट, संवेदनशील पण हिंमतबाज मलालाने एका डायरीत शब्दबद्ध केली. पुढे तीच बीबीसीच्या उर्दू आवृत्तीत ‘गुल मकाई’ या नावाने प्रसिद्ध झाली आणि तालिबान्यांचा भेसूर, अमानवी चेहरा जगासमोर आला. त्यामुळे मलाला तालिबान्यांच्या हिटलिस्टवर येणे स्वाभाविकच होते. अर्थात तरीही ती त्यांच्याविरुद्ध बोलत राहिली. अखेर, त्याची ‘शिक्षा’ तिला मिळाली. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिच्या बसवर हल्ला केला. मलालावर गोळ्या झाडल्या. आता तिच्या डोक्यातून गोळी काढण्यात आली आहे. मलालाची प्रकृती स्थिर असली तरी स्वातच्या या ‘धैर्यबाले’वरील मृत्यूचे तालिबानी सावट दूर झालेले नाही. ‘मलाला वाचली तरी तिला पुन्हा ठार मारू’ अशी धमकी तालिबान्यांनी आताच दिली आहे. त्यामुळेच मलालाच्या जीविताला पुन्हा धोका उद्भवणार नाही, तिने सुरू केलेला संघर्ष मध्येच संपणार नाही आणि तालिबान्यांविरुद्ध पेटून उठलेली ‘ठिणगी’ विझणार नाही हे पाहण्याची जबाबदारी पाक सरकारची आहे. जगाची आहे.

Comments